
कुणी कितीही कंड्या पिकवल्या. कुणी कितीही ढोल बडवले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल –संजय राऊत
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी ठाकरे यांची भेट घेतली असून, तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर राऊत यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीतील चर्चेविषयी काही मुद्द्यांवर माहिती दिली. यावेळी राऊत यांनी प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राविषयीही महत्त्वाचं भाष्य केलं. तसंच प्रताप सरनाईक आजन्म शिवसेनेत राहतील आणि त्यांच्याविषयी लवकरच बातमी कळेल, असं विधान राऊत यांनी केलं.
आजच्या बैठकीबद्दल बाहेर चर्चा व्हावी, असं काही नाही. सर्वकाही स्थिर स्थावर आणि सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या. कुणी कितीही ढोल बडवले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल. त्याच्याविषयी मी सगळ्यांना खात्री देतो,” असं म्हणत राऊत यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
www.konkantoday.com