संगमेश्वर तालुक्यातील कंटेन्मेंट झोनमधील गावागावात लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी
कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने संगमेश्वर तालुक्यातील चार गावांचा प्रतिबंधात्मक क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) समावेश केला आहे. या सर्व गावांमध्ये लसीकरणाची मोहीम प्राधान्याने राबवून कोरोनामुक्तीचा उपक्रम नव्याने सुरू करण्याची मागणी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांसह स्थानिकांनी केली आहे.
धामणी, नावडी, माभळे, कसबा या चार गावांचा कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. या निर्णयानुसार चारही गावांमधील नागरिकांची सरसकट कोरोनाविषयक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोविडशिल्ड, कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध करून या गावांमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविल्यास कोरोनाबाधितांची संख्या कमी होईल, असा दावा देवरूख पंचायत समितीचे सभापती जयाशेठ माने यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com