नांदीवडे ग्रामकृतीदलासह ग्रामपंचायतीने उभारलेले आयसोलेशन सेंटर ग्रामस्थांना वरदान
जयगड पंचक्रोशीतील कोरोना रुग्णांसाठी नांदीवडे ग्रामकृतीदलासह ग्रामपंचायतीने उभारलेले आयसोलेशन सेंटर एक वरदान ठरत असून येथून आतापर्यंत तब्बल ६० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. येथील सरपंच -उपसरपंच व त्यांच्या सदस्यांनी घरातील व्यक्तिंप्रमाणेच या रुग्णांची सेवा केल्यामुळे नांदीवडेने तालुक्यातील ग्रामपंचायतींसमोर आदर्श ठेवला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा फटका रत्नागिरी तालुक्याला मोठ्याप्रमाणात बसला. काही कंपन्यांच्या कामगारांमार्फत ही साथ अनेक गावात पसरली होती. जयगड पंचक्रोशीमध्येही कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली होती. नांदीवडे, कचरे , संदखोल, कासारी, सांडेलावगण, जयगड या ठिकाणी रुग्ण संख्या वाढली होती.
www.konkantoday.com