डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित रत्नागिरी जिल्ह्यातील ८० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू
महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित २१ रुग्ण
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे, ही दिलासाची बाब असली तरीही आता आणखी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील डेल्टा प्लस व्हेरियंटने संक्रमित २१ रुग्ण आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ९ डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण सापडले होते. त्यामधील एका व्यक्तीचा मृत्यू दिनांक १३/०६/२०२१ रोजी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय येथे झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित ८ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.
हा रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. संगमेश्व तालुक्यामधील ८० वर्षाच्या महिलेचा या नव्या स्ट्रेनने मृत्यू झाला आहे.