मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात दरड कोसळली; काही काळ वाहतुकीला ब्रेक
खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात आज सकाळी दरड
कोसळल्याने महामार्गावरील भोस्ते घाटातील वाहतुक
काही काळ ठप्प झाली होती. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रस्त्यावर उतरून कोसळलेली दाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तासभर वाहतुक खोळंबून सुद्धा आपत्ती व्यवस्थापन किंवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारकंपनीची यंत्रणा घटनास्थळी पोहचली नव्हती.
कालपासून कोकणात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी दिवसभरात खेड.चिपळूण, दापोली या भागात चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे अशा घटना घडल्या. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारासमहामार्गावरील भोस्ते घाटात दरडीचा काही भाग कोसळून रस्त्यावर आला. त्यामुळे भोस्ते घाटातील एका बाजूची वाहतुक ठप्प झाली.
सुरवातीला रस्त्यावर आलेली माती महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी आणि वाहनचालक यांनी बाजूला करून वाहतुक सुरळीत
करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा मोठ मोठे दगड रस्त्यावर आले आणि रस्त्याची एक बाजु वाहतुकीस बंद झाली.
ही दुर्घटना घडून तासभर उलटून गेला तरी तालुका आपत्ती व्यवस्थापन किंवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीची
आपत्ती निवारण यंत्रणा घटनास्थळी फिरकली नव्हती त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.
www.konkantoday.com