
निवडणुका पुढे ढकलण्यासाठी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविणार
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना दिलेले अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशावेळी राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली. कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावर या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत.
www.konkantoday.com