
रत्नागिरी जिल्ह्याला जलपर्यटची मोठी संधी उपलब्ध होणार ,भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारण्यात येणार
रत्नागिरी जिल्ह्याला जलपर्यटची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने हालचाली सुरू झाल्या असून येथील भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुण्याची सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च सेंटर (सीडब्ल्युपीआरएस) आणि या प्रकल्पाची सल्लागार कंपनी असलेल्या ‘फॅक्ट’च्या अधिकार्यानी चार दिवस पाहणी केली. त्यामुळे अलिशान क्रुझला रत्नागिरीत थांबा मिळणार हे निश्चित झाल्याले आहे.
नियोजित भगवती बंदर क्रुझ टर्मिनल मोठ्या क्षमतेचे प्रवासी जहाज ये-जा करू शकेल, अशा पद्धतीने टर्मिनल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये टर्मिनल आकार घेणार आहे. मांडवी पर्यटन संस्थेने देखील हे टर्मिनल व्हावे, यासाठी मागणी लावून धरी होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या क्रुझ टर्मिनल साठी १००कोटीच्या अर्थसहायाची तरतुद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्याने कोकणाच्या पर्यटन वाढीच्यादृष्टीने हा सर्वांत मोठा निर्णय आहे.
www.konkantoday.com