घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या रूग्णाचा मृत्यू
घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार (दि २२) रोजी समोर आला होता. अखेर बुधवार (दि २३) रोजी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
श्रीनिवास नागेश यल्लपा (वय २४, रा. कमानी, कुर्ला) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. दि २० रोजी त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मेंदूज्वर, लिव्हर खराब होणे तसेच विविध अवयव खराब होत जाणे अश्या विविध कारणांनी या तरुणाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
www.konkantoday.com