करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्याकडुन बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या उच्चांकाची नोंद

करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्याने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या उच्चांकाची नोंद केली. दिवसभरात राज्यात ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस देण्यात आली. यामुळे लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळाल्याचे चित्र आहे.

लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्यात आतापर्यंत २ कोटी ९१ लाखांहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांचे लसीकरण करून उच्चांक नोंदविण्यात आला होता. बुधवारी दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button