रिफायनरी प्रकरण पुन्हा पेटले , राजापूर नगर परिषदेमध्ये रिफायनरी समर्थन ठरावाला पाठिंबा देणार्या शिवसेना नगरसेविकेला पक्षातून काढले
राजापूर परिसराचा विकास होण्यासाठी राजापूर परिसरात रिफायनरी व्हावी असा ठराव आज राजापूर नगर परिषदेमध्ये मंजूर झाला त्याला शिवसेनेच्या दोन सदस्यांनी पाठिंबा दिला होता
राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांना पक्षातून काढून टाकल्याची आमदार राजन साळवी यांनी घोषणा केली आहे या परिसरात रिफायनरी व्हावी यासाठी काँग्रेस पक्षही पुढे आला आहे नगराध्यक्ष अँड.जमीर खलपे यानीच हा ठराव सभेसमोर आणला होता तो बहुमताने मंजूर झाला होता
www.konkantoday.com