राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना राखीव जागांची ठरवून दिलेल्या शुल्काची रक्कम वितरीत करण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी
राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना २५ टक्के राखीव जागांची ठरवून दिलेल्या शुल्काची रक्कम, आरटीई अंतर्गंत त्वरीत वितरीत करण्यासंबंधी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी मागणी केली.
तर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात उदयनराजेंनी म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांमध्ये उद्याच्या भारतीय लोकशाहीची मुल्ये रुजवताना, आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्राकडे जाते आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्र हे अतिमहत्वाचे क्षेत्र आहे. मागील सुमारे दीड वर्षापासून सुरु असलेल्या करोना महामारीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या संबंधीत अनेक विधायक निर्णय घेवून आपल्या शिक्षण खात्याने निश्चितच करोना लढाईतील वाटा उचलला आहे असे म्हटले आहे
www.konkantoday.com