
मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयामध्ये ICU मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या डोळ्याला उंदरानं चावा घेतला
करोनाच्या संकटामुळे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट केल्या. मात्र, तरीदेखील अद्याप त्यामध्ये सुधारणा होत नसल्याचंच दिसून येत आहे. याचं ताजं उदाहरण देशाची आर्थिक राजधानी म्हणून मिरवणाऱ्या मुंबईच्या पालिका रुग्णालयातच दिसून आलं. मुंबईतील घाटकोपरमध्ये असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयामध्ये चक्क ICU मध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाच्या डोळ्याला उंदरानं चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आयसीयू, ज्याचा शब्दश: अर्थ ‘अती दक्षता विभाग’ असा आहे, त्याच विभागातील दक्षतेचे वाभाडे निघाले आहेत. या प्रकारावर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून सारवासारव करण्यात आली असली, तरी मुंबईच्या महापौरांनी मात्र, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
www.konkantoday.com