
काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता -सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत
कोविडच्या महामारीचा लाभ घेत काही बोगस डॉक्टर्स चुकीचे उपचार करण्याची शक्यता आहे. अशा डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः वैभववाडी आणि दोडामार्ग याठिकाणी लक्ष केंद्रीत करावे. गेल्या तीन वर्षात विविध कारणांनी झालेल्या मृत्यूंचा रुग्णालयनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिले.
www.konkantoday.com