महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद-विवाद नसल्याचं सांगत हे सरकार ५ वर्षे टिकेल – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम सुरु असल्याचा खळबळजनक दावा प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात केलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरु होऊन, राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळण्याच्या चर्चेला उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद-विवाद नसल्याचं सांगत हे सरकार ५ वर्षे टिकेल असा दावा केलाय
www.konkantoday.com