आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिअंटचे ९ रुग्ण ,तर जिल्हाधिकारी म्हणतात एकही रुग्ण नाही
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात एकही डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्ण नसल्याचे ठामपणे सांगितले होते त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात डेंन्टा प्लस व्हेरिअंटचे ९ रुग्ण सापडल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनता द्विधा मनस्थितीत सापडलीआहे
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रत्नागिरी जिह्यात एकही डेल्टा प्लस व्हेरिअंटचे रुग्ण सापडलेला नाही असा खुलासा केला होता तसेच अशा प्रकारचे चुकीची वृत्त छापून माध्यमांनी लोकांच्यात गैरसमज व भीती पसरवू नये असे सांगून माध्यमांवर खापर फोडले होते तसेच या विषाणूला कोणतेही नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नये असेही सांगितले होते त्यामुळे जिल्हाधिकार्यांचा रोख माध्यमांवर होता अशी वृत्त कुठून आली याची माहिती घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले होते त्यानंतर झालेल्या नामदार उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिअंटचे एकही रुग्ण नसल्याचे स्पष्ट केले होते तसे राज्याच्या आरोग्य विभागाच्या फोर्सचे प्रमुख डॉ तात्यासाहेब लहाने यांनीदेखील तसे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले होते तरी देखील शक्यता लक्षात घेऊन दक्षता म्हणून त्या भागात प्रतिबंध क्षेत्र निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले होते याबाबत एका पत्रकारानी हे वृत्त आले कोठून? कोणी जिल्ह्याची बदनामी करतेय का ? याचे कारण शोधणाऱ आहेत का असा प्रश्न विचारला होता सामंत यांनी सांगितले होते की याबाबतची कायदेशीर बाब असेल ती जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे जिल्हाधिकार्यांनी ती प्रक्रिया सुरू केली आहे यामध्ये आपण एखादी चर्चा सुरू करतो त्या वेळी ते एखाद्या वर्तमानपत्रांपुरती मर्यादित राहात नाहीत शेवटी वर्तमानपत्र देखील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम आहे त्यामुळे त्या बाबतीत कसं पुढं जायचं हे जिल्हाधिकारी वरिष्ठांशी बोलून ठरवून घेतील असे स्पष्ट केले होते
दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या २१ केसेस सापडल्या असून त्यामध्ये रत्नागिरी जिह्यात नऊ केसेस सापडल्याचे स्पष्ट केले आहे .या सर्वांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला आरोग्यमंत्र्यांचे ऐकायचे की जिल्हाधिकाऱ्यांचे असा प्रश्न पडला आहे.
www.konkantoday.com