इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कामामधील १५५ इंटरनेट खांबाची चोरी
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कामामधील आठ लाख ५४ हजार ५० रुपये किमतीच्या १५५ इंटरनेट खांबाची चोरी झाल्याची तक्रार गुहागर पोलीस स्थानकात करण्यात आली. एकूण १९० खांब आणण्यात आले होते. खांब उभारून लाइन खेचण्याचे काम सुरू आहे.
www.konkantoday.com