शिवसेना व भाजपच्या सुमारे ४० पदाधिकारी कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील भारत पेट्रोलपंप येथे आयोजित केलेल्या कमी दरात पेट्रोल विक्रीवरून शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे येथील वातावरण काही काळ तंग झाले होते. या घटनेनंतर कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या घटनेनंतर आमदार नाईक यांच्यासह शिवसेना व भाजपच्या सुमारे ४० पदाधिकारी कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com