कोरोना काळात आमदार शेखर निकम यांचा मतदारसंघात मदतीचा ओघ सुरूच मतदारसंघात २ ऑक्सिजन काँन्सनट्रेटर सुपूर्त

चिपळूण संगमेश्वरचे कार्यक्षम आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने chemDist चे संचालक तुषार वाघ आणि डॉ सुनील ढोले*यांच्यातर्फे सुमारे दीड लाख रुपयांचे दोन ऑक्सिजन काँन्सनट्रेटर मतदारसंघात सुपूर्त करण्यात आले.
आमदार शेखर निकम यांनी ते चिपळूण ग्रामीणसाठी एक संजीवनी हॉस्पिटल, सावर्डे आणि चिपळूण शहर साठी एक अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे ते सुपूर्त केले. त्यावेळी संजीवनी हॉस्पिटल सावर्डे चे डॉ. पाटील, अपरांत हॉस्पिटलच्या सौ. वैशाली यतीन जाधव, उद्योजक श्री. महेश आंब्रे, श्री निलेश धनावडे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते ऋतुज डाकवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या ह्या कालखंडामध्ये ह्यापुर्वीही आमदार शेखर निकम यांनी आरोग्य यंत्रणेवरी कमी करण्यासाठी अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता अनेकवेळा आपल्या आमदार निधीतून भरीव मदत देऊन केली व आजही करत आहेत.
www.konkanttoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button