कोचिवली एक्स्प्रेस मध्ये झालेली चोरी रत्नागिरीत नव्हे तर गुजरातमध्ये झालेली,पोलीस तपासात ही तक्रार खोटी असल्याचे आढळले
कुणालकुमार संजीव शर्मा(२३,मूळ रा.बिहार,सध्या रा.रेल्वेस्टेशन) याने कोचिवली एक्स्प्रेस मधून प्रवास करीत असताना रत्नागिरी रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञाताने तरूणाने रत्नागिरी स्थानकाजवळ त्यांची बॅग लांबवून ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल लांबविल्याची तक्रार केली होती याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आली हाेती.ही घटना मंगळवार १५ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजण्याचा सुमारास डेहराडून कोचिवली एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या अलीकडे घडली हाेती मात्र पोलीस तपासात ही तक्रार खोटी असल्याचे आढळले.
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याचा तपास करणारे हेडकॉन्सेटबल संतोष कांबळे यांनी कुणालकुमार शर्मा याच्या मोबाईलचा सीडीआर काढण्याकरीता पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रव्यवहार केला. त्यानंतर शर्मा याचा मोबाईल लोकेशन रत्नागिरीतील येत असल्याने त्याला चौकशी करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे बोलावले. यावेळी केलेल्या चौकशीत शर्मा याने मित्राच्या सांगण्यावरून चोरी रत्नागिरीत झाल्याची तक्रार दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात हा ऐवज गुजरात येथे चोरीला गेला होता. मात्र त्याने मित्राच्या सांगण्यावरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस हेडकॉन्सटेबल संतोष कांबळे,स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्सटेबल संजय कांबळे,विजय आंबेकर यांनी या तपासात मदत केली.
www.konkantoday.com