
उपमुख्यमंत्री अजितदादांनी शहरातील पर्यटन स्थळांसह मि-या धुप प्रतिबंधक बंधा-याला भेट द्यावी नागरिकांच्यासह समविचारीची मागणी
रत्नागिरीः महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री ना.अजितदादा पवार सोमवारी रत्नागिरीत येत असल्याचे जाहीर झाले आहे.कोरोनासह विकासात्मक विषयावर ते लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे यापूर्वी अनेकदा रत्नागिरी दौऱ्यावर आलेले आहेत.सद्य स्थितीत बदललेल्या रत्नागिरी शहरातील सर्व पर्यटन स्थळे,मिरकरवाडा बंदरसह भिजत घोंगडे पडलेल्या मि-या धूप प्रतिबंधक बंधारा याची पहाणी त्यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने बाबा ढोल्ये,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,निलेश आखाडे,रघुनंदन भडेकर यांनी केली आहे.
वर्षानुवर्षे महत्त्वाचे प्रश्न जैसे थे आहेत.निधी जाहीर होतो.घोषणा होतात.मग कामे का होत नाहीत ? असा सवाल नागरिकांच्या वतीने समविचारीने केला आहे.
विकासाच्या पर्वावर विराजमान झालेल्या रत्नागिरीचे दर्शन ना.पवार यांनी करावे आणि मौलिक सुचना कराव्यात असे नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
समविचारीच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्रश्न वेळोवेळी निवेदनाधारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले त्या बाबतीत योग्य ती दखल घेण्यासाठी सर्व प्रश्नांचे सविस्तर निवेदन ना.पवार यांना देण्यात येणार असल्याचे महासचिव श्रीनिवास दळवी यांनी सांगितले
www.konkantoday.com