
एका दिवसात १५ लाखांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा
कोरोना काळात थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी रनपकडून थकबाकीदार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या. याचा सकारात्मक परिणाम घरपट्टी वसुलीवर झाला आहे. एका दिवसात रनपच्या तिजोरीत १५ लाख २२ हजार इतकी घरपट्टी वसुली झाली आहे. घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी पालिकेत गर्दी केली आहे.
१४ कोटी उद्दिष्ट असताना फक्त ८ कोटी वसूल झाले आहेत तर ६ कोटी थकित आहेत. थकबाकी वसुलीसाठी पालिकेने जादा कर्मचारी कामाला लावून साडेचौदा हजार इमलेधारकांना घरपट्टीची नोटीस देण्याची मोहीम हाती घेतली. त्यासाठी दरदिवशी ५०० घरांना नोटीस बजावण्याचे, चिकटविण्याचे टार्गेट या कर्मचार्यांना पालिका प्रशासनाने दिले हाेते www.konkantoday.com