सिंधुदुर्ग मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा जोरदार राडा,शिवसेनेच्या पेट्रोल वाटप कार्यक्रमावरून सेना-भाजपमध्ये वाद उफाळला
मुंबई येथील शिवसेना भवनाच्या समोरील भाजप-शिवसेनेच्या राड्यानंतर आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षात पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळाला. सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर हा राडा झाला.शेवटी पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली
शिवसेनेच्या पेट्रोल वाटप कार्यक्रमावरून सेना-भाजपमध्ये वाद उफाळला. भाजपचे ओळखपत्र दाखवा एक लीटर पेट्रोल मोफत मिळवा, अशी ऑफर आमदार वैभव नाईक यांनी आज सुरु केली. शिवसेना वर्धापनदिनी पेट्रोल वाटपाची शिवसेनेची ही ऑफर होती. याच ऑफरवरून सेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आणि गोंधळ निर्मा झाला.
मुंबई येथील शिवसेना भवनाच्या समोरील भाजप-शिवसेनेच्या राड्यानंतर आता पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणावात भर पडली. आज शिवसेनेचा वर्धापनदिन होता त्याचं औचित्य साधून कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी १०० रुपयात दोन लिटर पेट्रोल तर भाजपचं कार्ड असेल तर एक लीटर पेट्रोल फ्री दिले जाईल अशी घोषणा केली.
ही घोषणा राणे यांच्या कुडाळ येथील पेट्रोल पंपावर केली. त्यामुळे सकाळीच पेट्रोल भरण्यासाठी नागरिक दाखल झाले. आमदार वैभव नाईक देखील पेट्रोलचे उरलेले पैसे देण्यासाठी कुडाळ पंपात आले. त्याचवेळी भाजपचे कार्यक्रते देखील त्याठिकाणी दाखल झाले. त्यामुळे शिवसेनेच्या पेट्रोल वाटप कार्यक्रमावरून सेना-भाजपमध्ये वाद झाला. अखेर याठिकाणी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केला. असे असताना देखील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले आणि राडा झाला.
अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना बाजूला केले.कोराेना नियमाचा भंग केला म्हणून दोन्ही गटांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत
www.konkantoday.com