
सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून कोरोना हद्दपार होऊ शकतो-खासदार शरद पवार
मोठ्या संकटाचा सामना आपण सर्वजण करतो आहोत. एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येत आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून याच्यावर मात करू शकतो आणि कोरोना हद्दपार होऊ शकतो, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यतील जिल्हा समादेशक कार्यालय इमारतीमध्ये कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या निधीतून ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे. याचे लोकार्पण खासदार श्री पवार यांच्या हस्ते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन करण्यात आले
www.konkantoday.com