
पर्यटकांनो महाबळेश्वर व पाचगणीत या, पण अँटिजन टेस्ट करून
महाबळेश्वर -पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे अनेक दिवसांच्या टाळेबंदीनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर -चौगुले यांनी महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. या वेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी.एम बावळेकर उपस्थित होते.
www.konkantoday.com