
चला, थोडे अन्नदात्याचे कष्ट अनुभवू या!
करोनाच्या दुसऱ्या लाटेला परतवून लावताना अगदी थकून गेला असाल ना? चार खोल्यांच्या घरात, घुसमटलेल्या वातावरणात दिवस-रात्र घालवताना कमालीची नकारात्मकता भवताली भरून राहिली असेल ना? हे सारं सोडून-तोडून निसर्गाच्या कुशीत काही तरी वेगळं अनुभवावं, असं वाटतंय ना?
मग वाट कशाची बघताय? भर पावसात कोकणातली ‘भात लावणी’ प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आमच्या राजवाडीत या! रत्नागिरीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरचं हे अस्सल कोकणी गाव! इथल्या शेतकरी भावा-बहिणींनी पिकवलेल्या सेंद्रीय भाजीची चव तुम्ही गेली पाच वर्षं चाखली आहे. या वर्षी इथल्या भातलावणीमध्ये सहभागी होऊन या कृषी जीवनाची झलक अनुभवा! शिवाय, त्यांच्याबरोबर चिखलमाती तुडवल्यानंतर नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडावर मनसोक्त आंघोळ आणि चुलीवरचं खमंग, रूचकर जेवण !!

येत्या २६ जूनपासून सुमारे ८ दिवस दररोज सकाळी ९ ते १२ या वेळात हा उपक्रम होणार आहे. यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही सहभागी होऊ शकता. यासाठी प्रति व्यक्तीला ४०० रूपये शुल्क आहे. (५ वर्षांखालील मुलांना मोफत!)
अडचण एकच आहे – करोनाविषयक निर्बंधांमुळे इथे दररोज फक्त १० ते १२ जणांना प्रवेश मिळणार आहे. तेव्हा खरंच घाई करा!! आपला दिवस आजच पक्का करा. नाही तर पुन्हा संधी थेट पुढल्याच वर्षी!!
नावनोंदणीसाठी संपर्क
राजवैभव राऊत – 9604082278
सुहास लिंगायत 80101 14215