
कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण, सागरी किनारा महामार्ग चार पदरी करावा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. त्याचबरोबर कोकण सागरी किनारा महामार्ग चार पदरी करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी लिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण एक्प्रेस वे या प्रकल्पांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला.कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण मार्ग आहे. हा महामार्ग चार पदरी करावा. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल व पर्यटक वाढीसाठीही उपयोग होईल. या महामार्गावरील खाडींवरील सर्व पुलांचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. भूसंपादनाची कमीत कमी गरज भासेल, अशा प्रकारे कामाची आखणी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
www.konkantoday.com