
आषाढी एकादशीला दहाही मानाच्या पालख्यांचा एसटीतून प्रवास होणार
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या पालख्यांना बसेसमधून जाण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार या दहाही पालख्यांसाठी एसटी बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. त्यामुळे आषाढी एकादशीला दहाही मानाच्या पालख्यांचा एसटीतून प्रवास होणार आहे.
www.konkantoday.com