
आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांच्या माध्यमातून वर्षभर मूल्यमापन करण्यात येणार
करोनाचा प्रादुर्भाव आणि त्याचे परिणाम याबाबत गेले संपूर्ण वर्ष बेसावध राहिलेल्या शालेय शिक्षण विभागाला आता जाग आली आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत निर्माण झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वाभूमीवर आता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांच्या माध्यमातून वर्षभर मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत होणाऱ्या वर्षभरातील परीक्षाही गांभीर्याने घ्याव्या लागणार आहेत.
करोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. परीक्षा रद्द केल्या तरी या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा पेच निर्माण झाला.
www.konkantoday.com