सिंधुदुर्गाचा अनलॉक प्रक्रियेतील तिसऱ्या स्तरात सामावेश -पालकमंत्री उदय सामंत
सावंतवाडी:-सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पोझिटिव्हीटी रेट साडे नऊ टक्क्यापर्यंत आल्याने तसेच बेड संख्या देखील ५५.२० टक्के पेक्षा कमी ओकीपाय असल्याने शासनाच्या निकषानुसार तिसऱ्या स्तरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला.
अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह इतर दुकानांना देखील सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, स्तर तीनचे सर्व नियम व अटी लागू करण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती आज पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन द्वारे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.*
www.konkantoday.com