शासनाच्या निकषाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा अद्यापही चौथ्या टप्प्यात? अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापाऱ्यांना दिलासा नाही
रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने काल जाहीर केल्याप्रमाणे रत्नागिरी जिह्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला होता त्यामुळे रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यातून तिसर्या टप्प्यात येऊन इतर व्यावसायिकांना सवलत मिळेल असा अंदाज होता मात्र आज शासनाकडून जाहीर झालेल्या निकषामध्ये पॉझिटिव्हिटी रेटमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ११.९० दाखविला गेला आहे हा रेट दहा च्या खाली आला असता तर रत्नागिरी जिल्हा तिसर्या टप्प्यात आला असता मात्र आता शासनाच्या आकडेवारीनुसार हा जिल्हा अद्यापही चौथ्या टप्प्यातच राहणार आहे रत्नागिरी जिल्हा तिसर्या टप्प्यात आला असता तर इतर व्यावसायिक व व्यापाऱ्यांना सवलत मिळून सर्व प्रकारची दुकाने उघडली गेली असती गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट कमी आला आहे हे जरी खरे असले तरी तो दहा च्या खाली न आल्याने रत्नागिरी जिल्हावासियांना परत एकदा हा आठवडा तरी चौथ्या टप्प्याच्या बंधनातच राहावे लागणार आहेत काल झालेल्या पत्रकार परिषदेत नामदार उदय सामंत यांनी देखील रत्नागिरी जिह्यातील पॉझिटिव्हिटी चा रेट कमी होत असल्याने जिल्ह्याला टाळेबंदीत सवलत मिळेल असे म्हटले होते त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांच्या मध्ये आशा निर्माण झाली हाेती पॉझिटिव्हीटी रेट निकषात आला नसला तरी ऑक्सिजन व्याप्त बेडची टक्केवारी कमी म्हणजे ४२.१९ आल्याने हा रत्नागिरी जिल्हावासियांना दिलासा आहे दुसरीकडे शासनाच्या या आठवड्यात जाहीर झालेल्या निकषाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट ९.६ असा आला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजन व्यापलेल्या बेडची टक्केवारी पन्नास टक्केपेक्षा जास्त आहेम्हणजे ५५.२० आहे त्यामुळे हा जिल्हाही बहुधा चौथ्या टप्प्यात राहणार आहे या आठवड्यात रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जास्तीत जास्त स्टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यामुळे आता पुढील आठवड्यात जाहीर होणार्या शासनाच्या निकषामध्ये रत्नागिरी जिह्याचा टप्पा कमी होईल असा अंदाज आहे
www.konkantoday.com