रत्नागिरी शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना, व वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक;- ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी शहरातील खोदलेले, चर पडलेले चिखलमय रस्ते रत्नागिरीकरांच्या माथी मारले गेले आहेत. त्यामुळे ट्रॅफिकची कोंडी मुख्य रस्त्यावर, अंतर्गत रस्त्यावर होत आहे. रस्त्याला पडलेले चर, खड्डे यातून वाट काढत वाहन चालवताना कसरत होत आहे. ट्रॅफिकचा प्रचंड खोळंबा होत आहे. रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने ट्रॅफिकला अधिक अडचणी निर्माण करत आहेत. पावसात रस्ते दुरुस्ती दुरापास्त आहे. पण किमान ट्रॅफिक पोलिसांच्या नियुक्त्या गर्दीच्या रस्त्यांवर करून ट्रॅफिक सुचारू होईल हे पाहण्याची जागरुकता दाखविणे आवश्यक आहे. विहार वैभवच्या समोरील कॉर्नर, टिळक आळी, भाजी मार्केट रोड, राम मंदिर नजीकचा चौक अशा अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम होत आहे. एस.टी. स्टँड समोरील रस्ता कायम ट्रॅफिक जाम अनुभवत असतो. एस.टी. स्टँडचे काम अजून पाच वर्षे पूर्ण होईल असे वाटत नाही. अशा स्थितीत स्टँड रोड वरील ट्रॅफिकचा लोड कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल ? हे पाहणे अत्यावश्यक झाले आहे. वाहनचालक, पादचारी नागरिक यांची खराब रस्ते त्यात ट्रॅफिक जाम यामुळे खूप अडचण होत आहे. रत्नागिरी शहरातील ट्रॅफिक कंट्रोल विंगने रत्नागिरीत उद्भवलेल्या अथवा निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन गर्दी होणारी ठिकाणे ट्रॅफिक जाम होणारे रस्ते या ठिकाणी ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी व्यवस्था करणे आवश्यक वाटते. शहर वाहतूक पोलीस निरीक्षक यांना याबाबत निवेदन देऊन नव्याने ट्रॅफिक जाम उद्भवत असलेल्या रस्त्यावर ट्रॅफीक पोलिस नियुक्त करावेत व शहरातील ट्रॅफिक सुनियंत्रित राहील यासाठी योग्य व्यवस्था लावावी अशी विनंती भा.ज.पा. रत्नागिरीने केली आहे. अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली आहे.
www.konkantoday.com