रत्नागिरी जिल्ह्यासाठी शुभसंकेत, पॉझिटिव्हीटी रेट कमी आला ,रत्नागिरी जिल्ह्यासाठी चार तज्ज्ञ डॉक्टराचे पथक दाखल -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट कमी होत चालला आहे हे शुभ संकेत आहेत आता हा रेट ८.६५असून
चाचण्यांचे प्रमाण आपण दहा हजारपर्यंत नेल्यास येत्या आठ दिवसांत हा रेट पाच टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो असे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक आरोग्य विभागाच्या मदतीला खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने तज्ज्ञ डॉक्टराचे पथक येत अाहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी चार डॉक्टराचे पथक याठिकाणी येत असून ते येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील हे पथक पंधरा दिवस याठिकाणी राहणार आहे रत्नागिरी जिह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने टाळेबंदी पुढे सुरू ठेवण्याचा प्रश्न येणार नाही असेही त्यानी स्पष्ट केले दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे सोमवारी रत्नागिरी दौर्यावर येत असून ते जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजनांबाबत माहिती घेणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com