देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जींद-सोनीपत मार्गावर आपल्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज.

रेल्वे मंत्रालयाने ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे, यासाठी 2,800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जींद-सोनीपत मार्गावर आपल्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे.ही पर्यावरणपूरक ट्रेन चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीने विकसित केली असून, 89 कि.मी. लांब या मार्गावर 110 कि.मी. वेगाने धावताना या रेल्वेची चाचणी आजपासून सुरू होत आहे. भारतीय रेल्वेच्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ प्रकल्पांतर्गत ही ट्रेन हरित वाहतुकीच्या दिशेने मोठे पाऊल आहे.हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय?हायड्रोजन ट्रेन ही हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानावर आधारित आहे. ती पारंपरिक डिझेल इंजिनच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक पर्याय आहे. या ट्रेनमध्ये हायड्रोजन गॅसचा इंधन म्हणून वापर केला जातो, जो ऑक्सिजनसह अभिक्रिया करून विजेचे उत्पादन करतो.

ध्वनी प्रदूषण कमीही ट्रेन सध्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सहज कार्य करू शकते आणि ती डिझेल ट्रेनच्या तुलनेत अधिक ऊर्जा-कार्यक्षम आहे. याशिवाय, डिझेल इंजिनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेन कमी आवाज निर्माण करते, त्यामुळे ध्वनी प्रदूषणही कमी होतेहायड्रोजन ट्रेन कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित करत नाही, त्यामुळे ती पर्यावरणासाठी अत्यंत अनुकूल आहे. ही ट्रेन 1,200 हॉर्सपॉवर क्षमतेसह 110 कि.मी. प्रती तास वेगाने धावू शकते आणि 2,638 प्रवाशांना एकाच वेळी प्रवासाची सुविधा देऊ शकते.हरियाणातील जींद-सोनीपत मार्गावर आजपासून सुरू होणारी ही चाचणी भारतीय रेल्वेसाठी एक मोठे पाऊल आहे. या 89 कि.मी. मार्गावर ट्रेनची तांत्रिक क्षमता, सुरक्षा मानके आणि कार्यक्षमता तपासली जाणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर या ट्रेनच्या नियमित प्रवासास सुरुवात केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button