रत्नागिरी ग्रीन रिफायनरी ऐवजी राजापूर रिफायनरी प्रकल्प असे नाव देण्याची मागणी
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला महत्वपुर्ण रिफायनरी प्रकल्प हा राजापूरात होत असल्याने या प्रकल्पाला रत्नागिरी ग्रीन रिफायनरी असे नाव न देता राजापूर रिफायनरी प्रकल्प असे नाव द्यावे अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी केली आहे. याबाबत रिफायनरी कंपनीशी बाकाळकर यांनी पत्रव्यवहार केला असून राजापूर ग्रीन रिफायनरी असे या प्रकल्पाचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या साडेचार लाख कोटी रूपयाच्या प्रकल्पाचे काँग़े्रेस पक्षाने स्वागत करत सकारात्मक भुमिका घेतली आहे.
www.konkantoday.com