मुजावर कंपाऊंड परिसरात पाणी भरण्याच्या पुन्हा प्रकार घडू नये यासाठी साफसफाई करण्यासाठी तोरण नाला व गटारावरील दुकान गाळे हलविण्याची नगरसेवक विकास पाटील यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
रत्नागिरी शहरात रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळेशहरातील मच्छी मार्केट जवळील मुजावर कम्पाऊंड परिसरात मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी घुसून लोकांचे मोठे नुकसान झाले होते याबाबत आता स्थानिक जागृत नगरसेवक विकास पाटील यांनी लक्ष घातले आहे पाणी भरण्यास कारणीभूत असलेल्या तोरण नाला व गटारे साफसफाई तातडीने करणे गरजेचे आहे या संपूर्ण परिसरात गटारावर फूटपाथवर दुकानगाळे खोके उभारलेले आहेत गटारात मोठ्या प्रमाणावर चिरे व कचरा असल्याने गटारे बुजून गेली आहेत त्यामुळे त्याखालील असलेल्या गटारांची साफसफाई करणे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी भरत आहे असा प्रकार पुन्हा होऊन पाणी भरून रहिवाशांचे नुकसान होऊ नये यासाठी हे दुकानगाळे हलवून त्या खालील गटारांची साफसफाई करणे आवश्यक आहे अन्यथा हा प्रकार पुन्हा उद्भवू शकतो यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी हे दुकान गाळे हलवावेत अशी मागणी या भागाचे स्थानिक नगरसेवक विकास पाटील यांनी केली आहे तसे पत्र त्यांनी आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतर त्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना दिले आहे या पत्रावर त्या भागातील शंभर नागरिकांच्या सह्या आहेत
www.konkantoday.com