कासव संवर्धनाचे आव्हान थोडासा धोका पत्करुन गावखडीच्या कासवमित्रांनी यशस्वीपणे पेलले
बदलत्या हवामानाचे आव्हान जैवविविधता जपण्यात आणि कासव संवर्धनातही आहे. गतवर्षी कोकण किनार्याला निसर्ग आणि यावर्षी तौक्ते वादळाने त्यात भर घातली. आधीच कासव विणीचा हंगाम थोडासा पुढे ढकलला गेला आहे. त्यात वादळांची भर पडूनही कासव संवर्धनाचे आव्हान थोडासा धोका पत्करुन गावखडीच्या कासवमित्रांनी यशस्वीपणे पेलले. कासवांच्या अंड्यांची दोन वेळा हाताळणी अत्यंत कौशल्यपूर्ण झाल्याने १२० पैकी ५७ कासवांना जीवदान मिळाले.
या मोहिमेचे शिल्पकार आहेत कासवमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील आणि त्यांच्या मार्गदर्शक संशोधक सुमेधा कोरगावकर, कोरोनातील परिस्थितीसह निसर्गातील बदलांचा परिणाम कासवांचा विणीचा हंगाम दोन महिने पुढे गेला होता. त्यात तौक्ते चक्रीवादळाचे सावट कासव संवर्धन मोहिमेवर निर्माण जाले होते. रत्नागिरीतील गावखडी येथील कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी त्यांची अंडी वाचविण्यासाठी सर्वप्रथम पावले उचलली होती.
www.konkantoday.com