लातों के भूत बातोंसे नहीं मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल भाजप नेते आशिष शेलार
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या आडून मारहाण करून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवून दिली असून, यापुढे शिवसेनेला लाथांनीच उत्तर मिळेल, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. मारहाण करणार्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल न झाल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र होईल, असेही शेलार यांनी सांगितले.
सोनिया आणि वधेरा आता शिवसेनेचे देव झाले असून, साठे, तेंडुलकर हे शत्रू झाले आहेत, अशी घणाघाती टीका करताना ‘लातों के भूत बातोंसे नहीं मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल,’ असे शेलार म्हणाले.
www.konkantoday.com