कोरोना लसीकरणासाठी आता कोविन (Cowin) प्लॅटफॉर्वर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही
कोरोना विरुद्धच्या लढाईत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी कोरोना लसीकरणासाठी आता कोविन (Cowin) प्लॅटफॉर्वर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन लोक ऑन दी स्पॉट लस घेऊ शकतात अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं की, आता कोरोना लसीकरणासाठी आधी रजिस्ट्रेशन करुन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. १८ वर्षांवरील नागरिक आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करुन लस घेऊ शकतात. सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
www.konkantoday.com