रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात जिल्ह्यात सरासरी 77.47 मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 77.47 मिमी तर एकूण 697.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 44.80 मिमी , दापोली 28.20 मिमी, खेड 164.40 मिमी, गुहागर 106.00 मिमी, चिपळूण 90.10 मिमी, संगमेश्वर 64.40 मिमी, रत्नागिरी 86.50 मिमी, राजापूर 57.00 मिमी,लांजा 55.80 मिमी.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 16 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दापोली तालुक्यात मौजे कॅम्प् येथील अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी विजेच्या धक्यामुळे विद्युत उपकरण जळून खाक झाले असून अंशत: 5 लाख 91 हजार 130 रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे माटवण येथे सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एकबाजूकडील संरक्षक भिंत पडून अंशत: 4 हजार रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे बांगतीवरे येथे गोविंद लक्ष्मण शिंदे यांच्या घराचे पाऊसामुळे अशंत: 16 हजार 50 रुपयांचे नुकसान झाले. मौजे कळबट येथे शेवंती नारायण महबहे यांच्या घराचे पाऊसामुळे अंशत: 65 हजार 650 रुपयांचे नुकसान झाले. कोणतीही जिवीत हानी नाही.
चिपळूण तालुक्यातील मौजे चिपळूण विभागातील वनोशी-पन्हाळ दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद. सदर ठिकाणी सां.बा. विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु, कोणतीही जिवीत हानी नाही. खेड-दापोली राज्य मार्गावर दरड कोसळल्याने सदर रस्ता बंद. सदर ठिकाणी सां.बा.विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु, कोणतीही जिवीत हानी नाही.
राजापूर तालुक्यात मौजे हातिवले येथे संजय शिंदे यांच्या घराचे पाऊसामुळे घराची सरंक्षक भिंत कोसळल्याने अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कोंडवाडी येथे अनंत राहटे यांचया गोठयाचे पाऊसामुळे अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कोळवण येथे निता शिवाजी मोरे यांच्या घराचे पाऊसामुळे अंशत: नुकसान , कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे चौके येथे प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराचे पाऊसामुळे अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही. मौजे कुंभवडे येथे जि.प. शाळाची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: नुकसान, कोणतीही जिवीत हानी नाही.
www.konkantoday.com