मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर जवळच्या गावमळा येथील लाखो रुपये किंमतीच्या डबरची रॉयल्टी चुकवून पळवापळवी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर जवळच्या गावमळा येथील गावाच्या मालकीच्या जागेत असलेल्या लाखो रुपये किंमतीच्या डबरची रॉयल्टी चुकवून पळवापळवी होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. महसूल विभागाने याबाबत चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली गेली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी दरम्यान चौपदरीकरणाचे काम दोन वर्षापासून सुरु आहे. मात्र, यापूर्वी चौपदरीकरणाचे काम केलेल्या ठेकेदार कंपनीने हे काम सोडून दिले. पहिल्या ठेकेदार कंपनीने संगमेश्वर ते बावनदी या दरम्यानचे काम करीत असताना सामानाची ने आण करण्यासाठी गावमळा येथे जागा घेतली होती.दरम्यान गावातील वाडीच्या मालकीची जुनी जागा भाड्याने घेतली होती. त्याठिकाणी या कंपनीने डबर टाकले होते. परंतु पहिली ठेकेदार कंपनी काम सोडून गेल्यानंतर या डबरची पळवापळवी सुरु झाली आहे.
www.konkantoday.com