
प्रशासनाच्या पोकळ आश्वासनाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्त्याला भर घालून साचणाऱ्या पाण्याची समस्या सोडवली
कोतवडे , उंबरवाडी येथील ग्रामस्थांचा गटाराचा प्रश्न गेले अनेक महिने तसंच असून प्रशासनाकडून केवळ आठ दिवसांत काम सुरू करू असे पोकळ आश्वासन दिले जात होते
प्रशासन आज करेल, उद्या करणार, मंजूर झाला आहे, ८ दिवसात कामाला सुरुवात होईल अशी आश्वासन ऐकून कंटाळलेले ग्रामस्थ शेवटी रस्त्यावर आले उंबरवाडीतील ग्रामस्थांनी गावातील काही राजकीय लोकांचा मदतीने स्वतः कामाला सुरुवात केली आणि श्रमदानातून पावसात कायम साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला ज्याठिकाणी पाणी साठत होते त्या रस्त्यावर मातीची भर केली तसेच बाजूने गटारे काढली हा प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात तरी मार्गी लावला
www.konkantoday.com