
परिवर्तन संस्था आणि ब्लू हार्ट एक्सप्रेस लिमिटेड यांच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यातील १०८ मच्छिारांना जाळी वाटप
चिपळूण येथील परिवर्तन संस्था आणि ब्लू हार्ट एक्सप्रेस लिमिटेड यांच्या माध्यमातून तालुक्यातील दहा गावांमध्ये ३३ उद्योजकांना उपजीविकेच्या संसाधनाचे वाटप तसेच १०८ मच्छिमारांना मासेमारी जाळीचे वाटप करण्यात आले.शिरळ, खोपड, कालुस्ते बुद्रूक, करंबवणे, केतकी, भिले, वैजी, रेहेळ, भागाडी, खांदाटपाली आणि निरबाडे या दहा गावातील गरजू ३३ उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी वितरित केलेल्या उपजिविकेच्या साधनांमध्ये चार घरघंटी, १२ फुल शर्ट शिलाई मशिन व फॉल बिडींग मशिन, टेबलसह इस्त्री, फणस गरे कटिंग मशिन, टू व्हिलर टूल कीट, ड्रील मशिन, वूड टनिंग मशिन, ब्युटी पार्लर चेअर, वेल्डींग मशिन, कार पॉलिश मशिन, ग्राईंडर, वॉल चेसर, सुगंधी अगरबत्ती व वजन काटे, मच्छिमार महिलांसाठी शीतपेटी आणि वजनकाटा, फायबर होडी यांचा समावेश आहे. तसेच कालुस्ते बुद्रुक, शिरळ, निरबाडे व खांदाटपाली येथील १०८ मच्छिमार बांधवांना मासेमारी करिता जाळी वितरित करण्यात आली.यावेळी परिवर्तन संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक कदम, स्थानिक सरपंच, सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी परिवर्तनचे प्रकल्प समन्वयक गणेश खेतले, केतन गांधी, क्षेत्रीय कार्यकर्ते वृषाल साबळे, जीवन मोरे, मंगेश लोलम, तन्वी घाग, वसुधा पाकटे आदींनी प्रयत्न केले.www.konkantoday.com