आयोग न नेमता नारायण राणेंची समिती नेमून आरक्षण देणं चूक होती -ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन झाले. या आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनीधी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी, मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नसल्याचे सांगत आयोग न नेमता नारायण राणेंची समिती नेमून आरक्षण देणं चूक होती, असे म्हटले. गरीब मराठ्यांच्या कल्याणासाठी आरक्षण गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
www.konkantoday.com