
शाळेची घंटा वाजणार पण ती विद्यार्थ्यांसाठी नसून फक्त शिक्षकांसाठीच
१५जून म्हटले की, नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा होत असतो. शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जातो. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनामुळे हा दिवस उजाडलाच नाही नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे मात्र ते ऑनलाईनच. प्रशासनाने सोमवारपासून शिक्षकांना शाळेत हजेरी लावण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे शाळेची घंटा वाजणार असली तरी ती विद्यार्थ्यांसाठी नसून फक्त शिक्षकांसाठीच असणार आहे.
www.konkantoday.com