राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्यास मान्यता

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि इतर साथरोगांची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण भागातील जनतेला तत्काळ आरोग्यसेवा मिळणे अत्यावश्यक असल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी या संदर्भात जारी केलेल्या शासन आदेशात भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ मध्ये मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तसेच राज्यातील सत्तांतरानंतर महापरीक्षा पोर्टल रद्द करण्यात आले, त्यामुळे अद्यापर्यंत ही मेगाभरती होऊ शकली नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button