
सप्तश्रृंगी गडावरून परत येताना कार ३०० फूट दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू
नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावरुन दर्शन घेऊन परत येताना भाविकांवर काळाने घाला घातला. कार ३०० फूट खोल दरीत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घाटात कार ओव्हरटेक करताना अपघात झाला. या कारमधील सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंतचे रहिवासी आहेत. सप्तश्रृंगी गडाच्या गणपती पॉइंटजवळ रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना कार संरक्षण कठाडे तोडून कार ३०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली अन् बचावकार्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दुख व्यक्त केले.




