रत्नागिरीजवळील हातखंबा येथे खवले मांजराची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले
रत्नागिरीजवळील हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून ३.४६४ किलो ग्रॅम खवले मांजराची खवले जप्त करण्यात आली.
सचिन गजानन ढेपसे (४१, रा. सुपलवाडी नाचणे, रत्नागिरी ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी हातखंबा येथून खवले मांजराची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे यांना मिळाली होती. त्यानुसारच हातखंबा येथे पोलिसांनी सापळा रचला होता त्यावेळी संशयित हा आपल्या यामाहा मोटारसायकलवरून जात असता पोलिसांनी त्याला अडवून त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे खवले मांजराची खवले आढळून आले त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पोलीस खाते व वन विभाग यांनी एकमेकांच्या सहयोगाने कामगिरी करण्याचे आवाहन केले होते या योजनेचा भाग म्हणून आज मंगळवारी वन विभागातील अनेक तज्ञाकडून रत्नागिरी जिल्ह्याच्या ३२ अधिकाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई पाेउनि विनायक नरवणे सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग गोरे, पोलीस हवालदार महेश गुरव, आशिष शेलार, राजेश भुजबळराव, परेश पाटोळे, उदय चांदणे यांनी केली.
www.konkantoday.com