
रत्नागिरीकराना आता महावितरणच्या वसुलीचाही सामना करावा लागणार
कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे
दीड महिना लोकक डाऊन, त्यानंतर आठ दिवसांचे कडक लॉक डाऊन तौक ते चक्रीवादळ, अतिवृष्टीचा रेड अलर्ट अशा विविध संकटांचा सामना करणाऱ्या रत्नागिरीकराना आता महावितरणच्या वसुलीचाही सामना करावा लागणार असून थकबाकीविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय राज्यस्तरावरून घेण्यात आला आहे.थकबाकीचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने स्थानिक अधिकाऱ्यावर वसुली साठी नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करणे हे एकमेव अस्त्र असल्याने लवकरच थकबाकीदार वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्याची मोहीम सुरू करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता कोणतीही तडजोड करता येणार नाही यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीज देयक वेळेवर भरणे आवश्यक आहे, मुख्य अभियंता श्री देवेंद्र सायनेकर यांनी स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com