
भास्कर जाधवांना आता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही-निलेश राणे
भास्कर जाधव या वेळेला तुमचं डिपॉझिट विनय नातू या विधानसभेत जप्त करतील, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला. गुहागर येथील जाहीर सभेत राणे बोलत होते
भास्कर जाधव तुम्ही आमच्या दैवतावर बोलता हा निलेश राणे तुम्हाला एक दिवस धडा शिकवणार हे लक्षात ठेवा, असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे. गुहागर तालुक्यात फक्त पाच ठेकेदार आहेत. सगळी काम मुलाला, जावयाला, पुतण्याला हेच यांचे ठेकेदार आहेत. यांची अनेक बांधकाम बेकायदा अणि गरिबांना वेगळा न्याय या सगळ्याचा हिशेब अधिकार्यांना द्यावा लागेल. या संघर्षाची सवय राणे कुटुंबाला आहे, संघर्ष आम्हाला नवीन नाही, असं निलेश राणे म्हणाले आहेत. कुडाळ मालवण येथे खर्च करणार तेवढा खर्च गुहागरवर करणार. पण भास्कर जाधवांना आता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच राणे यांनी दिला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष केदार साठे, महिला आघाडीच्या स्मिता जावकर, सुरेखा खेराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com