
बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने रत्नागिरीतील एकाची ४५ हजाराची फसवणूक
बँक ऑफ महाराष्ट्रच्या बँक खात्याला आधार लिंक करण्याच्या बहाण्याने रत्नागिरी टिळकआळी येथे राहणारे कैलास श्रीधर किनरे यांची ४५हजाराची ऑनलाईन फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मूळचे कशेळी येथील राहणारेफिर्यादी कैलास किनरे हे सध्या रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे भाड्याने राहत आहेत फिर्यादीच्या मोबाईलवर अज्ञात अनोळखी इसमाने फोन करून फिर्यादी यांचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्याला आधार कार्ड लिंक झालेले नाही असे सांगून आधारकार्डचा नंबर घेतला आधारकार्ड लिंक झाल्यावर व्हेरिफिकेशन कोड येईल ताे माझे मोबाईलवर पाठवा असे सांगितल्याने फिर्यादी किनरे यांनी व्हेरिफिकेशन कोड आरोपीच्या मोबाइलवर पाठवल्याने त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र या खात्यातील ४४,९९५ रुपये अज्ञात इसमाने ऑनलाईन काढून घेऊन त्यांची फसवणूक केली याबाबत फिर्यादी कैलास किनरे यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com